By  
on  

नीतू सिंग यांना भेटल्यावर ऋषी यांच्या उणीवेने भावूक झाले अनुपम खेर

अभिनेता अनुपम खेर ऋषी आणि नीतू कपूर या जोडीच्या खुप जवळ होते. ऋषी यांना जाऊन 7 महिने पुर्ण होतील. पण अनुपम अजूनही ऋषी यांच्या नसल्याचं शल्य आहे. अलीकडेच नीतू सिंग यांना भेटल्यावर ऋषी यांच्या उणीवेने अनुपम खेर भावूक झाले. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

 

यासंबधी पोस्ट शेअर करताना अनुपम म्हणतात, ‘प्रिय नीतू, कालच्या चंदीगढच्या भेटीमुळे न्युयॉर्कच्या आठवणी ताज्या झाल्या. एकत्र वाहिलेल्या त्या अश्रूंनी नात्यांचा बंध अधिकच घट्ट केला आहे. चिंटूचं व्यक्तिमत्त्वच वेगळं होतं. तू पुन्हा कामाला सुरुवात केली याचा खुप आनंद आहे. ऋषीलाही ही बाब आवडली असती. कायम लक्षात ठेव काही नाती टेप रेकॉर्डरच्या पॉझ बटणासारखी असतात. ती तिथूनच सुरु होतात जिथं तुम्ही त्यांना सोडलं असतं.’ नीतू ब-याचकाळाने मोठ्या पडद्यावर वापसी करत आहे. वरुण धवन, कियारा आडवाणी  आणि अनिल कपूरसोबत जुग जुग जियो सिनेमात दिसत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive