By  
on  

भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाला ड्रग्ज प्रकरणात NCB ने केली अ‍टक

NCBने भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी रविवारी अटक केली आहे. भारतीला शनिवारीच अटक केली आहे. यावेळी या दोघांनीही गांजाचं सेवन केल्याचं मान्य केलं. भारतीला 'एनडीपीएस अधिनियम 1986’ नुसार अटक केली आहे. NCB ने मुंबईमध्ये भारती आणि हर्षच्या घरी आणि ऑफिसवर छापा मारला. दोन्ही ठिकाणाहून  86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

 

 

ANI ने या दोघांच्या अटकेची पुष्टी केली आहे. भारतीला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. ड्रग्ज प्रकरणात NCB ने आतापर्यंत दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. याशिवाय अर्जुन रामपाल त्याची गर्लफ्रेंड गैब्रिएला आणि तिच्या भावाला अटक केली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive