By  
on  

टेलिव्हिजन अभिनेत्री लीना आचार्य यांनी घेतला अखेरचा श्वास

अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्री लीना आचार्य यांचे शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी निधन झालं. गेले दिड वर्षं त्या किडनी विकाराने ग्रस्त होत्या. काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच लीना यांचं किडनी प्रत्यारोपण झालं होतं. त्यांच्या आईने त्यांची किडनी लीना यांना दिली होती.

 

 

पण काल लीना यांचा मृत्यू झाला.  लीना यांनी ‘सेठ जी’, ‘आप के आ जाने से’, ‘मेरी हानिकारक बीवी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय  ‘हिचकी’ या सिनेमात देखील त्या दिसल्या होत्या. लीना आजारपणातही एका किडनीद्वारे काम करत होत्या. त्यांच्या सहकलाकारांनी त्यांना श्रद्धांजलीवाहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive