By  
on  

‘कोका कोला’ सिनेमाच्या सेटवर या अभिनेत्रीने निर्मात्यांवर लावला शोषणाचा आरोप

मंदना करिमी आगामी कोका कोला सिनेमात दिसणार आहे. मंदना करिमीने या सिनेमाच्या निर्मात्यांवर शोषणाचा आरोप लावला आहे. तर निर्मात्यांनीही याला उत्तर देत अभिनेत्रीच्या अनप्रोफेशनल वर्तणुकीला दुजोरा दिला आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी मंदनाने ही बाब समोर आणली आहे. यासोबतच तिने टीमलाही दोष दिला आहे.

 

 

ही टीम प्रोफेशनल नसल्याचं मंदनाचं म्हणणं आहे. तर निर्माते धारीवाल पुरुषकेंद्र विचारांचे असून अंहकारग्रस्त आहेत. शुटवर लवकर पोहचूनही मला जास्त वेळ थांबण्यास सांगत होते. त्यानंतर निर्मात्यांनी मुलासोबत मिळून तमाशा सुरु केला याशिवाय व्हॅनिटीमध्ये येऊन माझ्यावर आरडाओरडा केल्याचंही तिचं म्हणणं आहे.तर निर्मात्यांनी मंदनाने सात लाख रुपये यापुर्वीच घेतल्याचं तसेच कामाच्या ठिकाणी खुप नखरे करत असल्याचा आरोप तिच्यावर केला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive