By  
on  

माधुरी दीक्षित आणि संजय कपूर ही जोडी आता नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार

माधुरी दीक्षित आणि संजय कपूर या जोडीचा गाजलेला सिनेमा म्हणजे ‘राजा’. या सिनेमाने या जोडीला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती दिली. त्यानंतर ही जोडी मोहब्बत या सिनेमात झळकली होती. त्यानंतर जवळपास दोन दशकानंतर ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये हे दोघंही दिसणार आहेत.

 

अ‍ॅक्ट्रेस असं या सिरीजचं नाव आहे. हा शो एक सस्पेंस ड्रामा आहे. माधुरी यात मुख्य भूमिकेत आहे. संजय या सिरीजसाठी 25 ऑक्टोबरपासून नाशिकमध्ये शुटिंग करत आहे. सेटवर काळजी घेऊन काम केलं जात आहे. माधुरीची व्यक्तिरेखा अचानक गायब होते. त्याभोवती ही सिरीज फिरते आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive