By  
on  

आदित्य नारायण गर्लफ्रेंड श्वेतासोबत 1 डिसेंबरला अडकणार लग्नाच्या बेडीत

गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण याच्या लग्नाचे सनई चौघडे वाजू लागले आहेत. 1 डिसेंबरला मंदिरात हे लग्न पार पडणार आहे. आदित्यने, ‘त्याच्या लग्नाचं फंक्शन खुपच सिंपल होणार असल्याचं सांगितलं आहे. करोनामुळे  खुपच साधेपणाने लग्न करणार असल्याचं आदित्यने शेअर केलं आहे. 

 

मंदिरमधील लग्नानंतर एक छोट्सं रिसेप्शनही असणार आहे. या लग्नात आदित्य-श्वेताच्या जवळचे नातेवाईक याशिवाय संगीत क्षेत्रातील काही जवळची मंडळीच उपस्थित असतील. आदित्य आणि श्वेताचा रोका सेरेमनी पार पडला होता. यावर्षीच आदित्यने त्याच्या या लेडी लव्हबाबत चाहत्यांशी शेअर केलं होतं. आदित्य आणि श्वेता शापित सिनेमाच्या वेळी एकमेकांना भेटले होते.

Recommended

PeepingMoon Exclusive