By  
on  

'मणकर्णिका'तील कंगानाचं हे रौद्र रुप पाहा;युध्दासाठी झालीय सज्ज

कंगनाच्या बहुचर्तित मणकर्णिका द क्वीन ऑफ झांसी या सिनेमातील आणखी एक नवीन लूक समोर आला आहे.सफेद रंगांच्या वेशभूषेत योध्दा रुपात कंगना दिसली. तिचं रोद्र रुप यात दिसून येत आहे.हातात तलवार घेऊन ब्रिटींशाविरुध्द लढा देण्यासाठी ती पूर्णपणे सज्ज झाली आहे. तसंच या फोटोत इंग्रज आणि झाशीच्या सैन्यामध्ये रंगलेलं तुफान युध्द ही पार्श्वभूमी दिसून येतेय.

सूत्रांच्या माहितीनुसार मणकर्णिकासाठी कंगनाने खुपच जबरदस्त असे अक्शन सीन्स दिले आहेत. तसेच या सिनेमातील राणी लक्ष्मीबाईच्या प्रमुख भूमिकेसाठी कठोर मेहनतसुध्दा  घेतलीय. या सिनेमात घोडेस्वारीसोबतच अनेक स्टंट लिलया करताना पाहायला मिळणार आहे. तिने यासाठी तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. एकूणच तिचं एक वेगळं आणि जुलमी ब्रिटीश राजवटीविरूध्दचं रौद्र रूप या सिनेमाद्वारे पाहणं फारचं औत्सुक्याचं ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/BoYDN9CBsQk/?taken-by=team_kangana_ranaut

येत्या 2 ऑक्टोबर रोजी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित होत आहे. सर्वांनाच याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

या सिनेमाबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे शरीक पटेल म्हणाले, “ झाशीच्या राणीचे शौर्य देशाच्या कानाकोप-यात पोहचावे हा या सिनेमामागचा महत्त्वाचा हेतू आहे. स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला लढा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल व हा सिनेमा प्रत्येकाचं मन जिंकून घेईलल अशी आम्हाला आशा आहे.”

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारी 2019 प्रदर्शित होणार आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive