By  
on  

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘भारत’मध्ये झळकणार वरुण धवन

सलमान खान स्टारर आणि अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत सिनेमाचं पहिलं शुटींग शेड्यूल माल्टा येथे पूर्ण झालं असून लवकरच या सिनेमाचं दुसरं शेड्यूल अबू धाबी येथे होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात वरुण धवनसुध्दा झळकणार असल्याचे वृत्त नुकतंच हाती आलं आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार या बिग बजेट सिनेमात सलमान आणि कतरिना कैफ यांच्यासोबतच एका विशेष व्यक्तिरेखेत वरुण धवनलासुध्दा पाहायला मिळणार आहे.

‘भारत’मध्ये वरुण एखादं गाणं करणार आहे की पाहुणा कलाकार असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण वरुण या सिनेमाचा भाग आहे हे  मात्र नक्की. कदाचित हा सिनेमाचा एक सरप्राईज भागसुध्दा असू शकतो, म्ङणूनच याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

वरुण धवन आणि सलमान खानचं नातं एखाद्या गुरु-शिष्याप्रमाणेच आहे. वरुणचे वडिल डेव्हिड धवन यांच्या अनेक सुपरहिट सिनेमाचा नायक सलमान खान होता. ही दिग्दर्शक-नायकाची जोडी 90 च्या दशकांत प्रचंड लोकप्रिय ठरली, हे आपल्याला माहितच आहे. सलमान नेहमीच आपला मित्र डेव्हिड यांचा मुलगा अभिनेता वरुण धवनला इंडस्ट्रीत नवीन काहीतरी प्रोजेक्ट्स करण्याच्या टिप्स देत असतो. वरुणच्या ‘जुडवा -2’मध्ये सलमान खान पाहुणा कलाकार म्हणून झळकला होता. त्यामुळे सलमान खानच्या सिनेमात वरुण धवन झळकणं, यात काही नवल नाही!

Recommended

PeepingMoon Exclusive