By  
on  

असा आहे भारतातल्या बिग बजेट '2.0' चा मेकिंग व्हिडीओ

दक्षिण सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला '2.0' या बहुचर्चित सायन्स फिक्शन सिनेमाचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. व्हीएफएक्सवर तब्बल 550 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून व्हीएफएक्सची कमाल मेकिंगच्या या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळतेय.

2.0 हा सिनेमा बनवणं सोप्पं नव्हतं हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येतं आहे. दिवस-रात्र हजारो लोक या सिनेमासाठी कष्ट करत होते. 2150 वीएफएक्स शॉट्स आणि 1000 वीएफएक्स आर्टिस्टचा उपयोग करण्यात आला आहे. तसंच याशिवाय 25 3D डिझाईनर, 500 क्राफ्ट्समॅन आणि 10 कॉन्सेप्ट आर्टिस्ट यांनी यावर काम केलं आहे. थेट 3D कॅमेऱ्याने शूट करण्यात आलेला हा देशातला पहिला सिनेमा आहे. हे स्पेशल इफेक्ट्स कशाप्रकारे देण्यात आले, सेट कशाप्रकारे उभारले कलाकार आणि तंत्रज्ञानाची सांगड कशाप्रकारे घालण्यात आली हे सर्व या व्हिडीओत पाहता येणार आहे.

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्यासोबतच या सिनेमात अभिनेत्री अमी जॅक्सनसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. बहुप्रतिक्षीत आशिया खंडातील सर्वात बिग बजेट ‘2.0’ हा सिनेमा 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.'

https://youtu.be/I_hSkYAVOUA

Recommended

PeepingMoon Exclusive