By  
on  

‘फू बाई फू’फेम संतोष मयेकर यांचं निधन;आज होणार अंत्यसंस्कार

‘फू बाई फू’फेम अभिनेते संतोष मयेकर यांचं मंगळवारी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आहे.संतोष मयेकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंधेरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

आपल्या विनोदांमुळे संतोष मयेकर यांनी फू बाई फू कार्यक्रमात स्वत:ची एक छाप पाडली. 'भैय्या हातपाय पसरी' या नाटकातील त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालंं. अनेक नाटाकांसह संतोष यांनी मराठी सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.मालवणी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ‘वस्त्रहरण’ या तुफान लोकप्रिय नाटकात तात्या सरपंचाची त्यांनी साकारलेली भूमिका गाजली.

२००६ मध्ये देवाशपथ खोटे सांगेन या सिनेमाद्वारे संतोषने मराठी सिनेमांमंध्ये पदार्पण केले होते.'चष्मेबहाद्दर', 'गलगले निघाले', 'आर्त', 'दशक्रिया' या सिनेमांमधूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

Recommended

PeepingMoon Exclusive