By  
on  

.....यासाठी गेले होते प्रियंका चोप्रा आणि निक जोनास जोधपूरला

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा विदेशी भावी पती निक जोनास दोघंही काल 2 ऑक्टोबरला जोधपूरमध्ये होते. दोघंही जोधपूरमध्ये काय करतायत, याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. आपल्या डेस्टिनेशन वेडिंगच्या शोधार्थ यांनी जोधपूर तर गाठलं नाही ना.. की या शहराला भेट देण्यामागचं काही खास कारण आहे, याबाबत ब-याच चर्चा रंगल्या होत्या.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या जोधपूर भेटीमागचं कारण आता समोर आलं असून आपल्या बेस्ट फ्रेंड्च्या वाढदिवसासाठी हे दोघंही इथे आले होते. प्रियंका आणि निक यांनी उमेद भवन येथे आपल्या मित्रांसमवेत वाढदिवसाचा जल्लोष साजरा केला आणि दुपारचं जेवणसुध्दा एकत्र एन्जॉय केलं.

हल्ली प्रियंकासाठी निक जोनासचं भारतात येणं-जाणं जास्तच वाढलं आहे. निकची ही भारतातली तिसरी फेरी आहे. सर्वप्रथम तो प्रियंकाला भेटण्यासाठी भारतात आला होता, त्यानंतर दोघांच्या रोका विधीसाठी संपूर्ण जोनास कुंटुबियच भारतात आले  आणि आता 2 ऑक्टोबरला प्रियंकाच्या मित्रपरिवारासोबत जोधपूरमध्ये वाढदिवसासाठी.

https://www.instagram.com/p/BocjPXtgrB7/?utm_source=ig_embed

 

संपूर्ण बॉलिवूड व हॉलिवूडलाही प्रियंका आणि निकच्या लग्नाचे वेध लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियंकाला डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे. त्यामुळे तर हे दोघं जोधपूरला वेडिंग स्पॉट निवडण्यासाठी खास पोहचले नव्हते ना असेसुध्दा बोलले जात आहे.

सध्या प्रियंका आपला सिनेमा स्काय इज पिंकच्या शूटींगसाठी भारतात असून या सिनेमात तिच्यासोबत फरहान अख्तर झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive