By  
on  

'आपला मानूस'च्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी : संजय राऊत

अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या तथाकथित आरोपानंतर आता मनसे पाठोपाठ शिवसेनासुध्दा नानांच्या मदतीला धावून आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त होऊ लागल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, तनुश्रीने जे काही नानांवर गैरवर्तवणुकीचे आरोप लावले आहेत, त्याप्रकरणी नानांनी आपलं मत जाहीरपणे अद्याप मांडलेलं नसल्याने आधी त्यांची बाजू ऐकून घेणं महत्त्वाचं ठरेल.

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, नाना पाटेकर फक्त अभिनेतेच नाही तर देशातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच नानांची भूमिका याप्रकरणी महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे व पुढे त्यांनी नानांनी तिला कायदेशीर नोटीस पाठविल्याचे नमूद केले आहे. .व जर ते दोषी असते तर त्यांनी नोटीस पाठविलीच नसती, असंही सांगितलं आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये तनुश्री आणि नानांची बाजू घेणारे असे दोन गट पडले आहेत. तर तनुश्रीच्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून मनसेने तिला बिग बॉसमध्ये घेतल्यास खळखट्ट्याकचा जबरदस्त धमकीवजा इशारा दिला असतानाचा आता या 'आपला मानूस'च्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहिली आहे.

आता महाराष्ट्रातले दोन मोठे पक्ष नानांच्या पाठीशी असल्याने हे प्रकरण आता आणकी कोणतं नवीन वळण घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive