नवाजुद्दीनवर माजी मिस इंडियाने केला लैंगिक गैरवर्तवणुकीचा आरोप

By  
on  

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर  मीटू मोहिम अधिक चर्चेत आली.गायक अनु मलिक, क्रिकेटपटू लसिथ मलिंगा, अभिनेता आलोक नाथ, दिग्दर्शक साजिद खान अशी अनेक नाव याप्रकरणानंतर चर्चेत आली. जणू काही एक वादळच बॉलिवूडमध्ये घोंघावू लागलंय. आता मीटू मोहिमेअंतर्गत आणखी एक अभिनेत्री पुढे आलीय.

माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप केले आहेत. निहारिकाने एक भलीमोठी पोस्टच लिहिली असून पत्रकार संध्या मेनन यांनी ते ट्विट केलं आहे. अभिनयाचा आणि मेहनतीच्या जोरावर आज नवाजुद्दीन यशोशिखरावर आहे.

”मिस लव्हली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नवाजुद्दीनसोबत चांगली मैत्री झाली पण नवाजचं अनेक मुलींसोबत अफेअर होतं हे मला नंतर कळालं. मुलींना खोट्या कहाण्या सांगून तो फसवतो. त्याचं हे रुप जेव्हा माझ्यासमोर आलं तेव्हा मी त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडले,’ असं तिने सांगितलं.

निहारिका सिंहने नवाजुद्दीनवर हे आरोप केले असले तरी निहारिका ही नवाजुद्दीनची कथित प्रेयसी असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता या प्रकरणावर नवाजुद्दीनचं स्पष्टिकरण महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share