विनता नंदा लैंगिक शोषण प्रकरणी आलोकनाथांविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल

By  
on  

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तवणुकीचा आरोप केल्यांनतर संपूर्ण बॉलिवूडच ढवळून निघालं आणि मी टू चळवळीने प्रचंड वेग घेतला. हे आपण जाणतोच,त्यानंतर अनेक अभिनेत्री आता आपल्यावर बेतलेल्या त्या प्रसंगाची वाच्यता सोशल मिडीयावर करु लागल्या आहेत. यात प्रसिध्द तारा मालिकेच्या निर्मात्या विनता नंदा यांनी बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले होते. आता त्यानंतर आलोकनाथ यांच्यावर दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ओशिवरा पोलिसांनी आलोकनाथ यांच्याविरोधात मंगळवारी दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. मात्र अद्यापपर्यंत आलोकनाथ यांना अटक करण्यात आलेली नाही.विनताच्या आरोपानंतर संध्या मृदुल, हिमानी शिवपुरी , रेणूका शहाणे  या बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आलोकनाथ यांच्यावुरोधात आवाज उठवला होता.

काय होती विनता नंदाची फेसबुक पोस्ट 

विनताने लिहलं होतं, “आलोकनाथ यांची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड आहे. आमचा खुप मोठा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आहे. आम्ही जवळपासच राहत होतो. त्यावेळेस मी दूरदर्शनवरील नंबर वन शो ताराची निर्मिती व लेखनही करत होती. ते माझ्या शोमधील नायिकेमध्ये बरेच इंटरेस्टेड होते, पण ती त्यांना धुडकावून लावत होती. त्यावेळेस ते टीव्हीचे स्टार असल्याने नेहमीच उद्दामपणाने वागत.एकदा त्यांनी त्या नायिकेबरोबर एवढी असभ्य वर्तवणूक केली की तिने त्यांना सर्वांसमोर जोरदार कानाखाली लावून दिली.

विनता पुढे सांगते, पण मोठा अभिनेता असल्याने आलोकनाथ यांच्या बेताल वागण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जायचं. माझ्याबरोबरसुध्दा त्यांनी खुप असभ्य वर्तवणूक केली आहे. एका पार्टीत त्यांनी माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून माझ्यावर बलात्कार केला.

Recommended

Loading...
Share