अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

By  
on  

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हिच्यावर पैसे घेऊन फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाक्षीसह इतर सात जणांवरसुद्धा हा गुन्हा नोंदवण्यात आला असून एकूण 37 लाख रुपयांची ही फसवणूक झाल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार, सोनाक्षीने एका इव्हेंटसाठी उपस्थित राहण्यासाठी मानधन घेतले परंतु ती आलीच नाही. इंडियन फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड्स कंपनीचे मालक प्रमोद शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलं की, सोनाक्षीसोबत या इव्हेंटसाठी आम्ही लेखी करारही केला होता, पण ती ऐनवेळेस आलीच नाही. घेतलेले मानधनाचे पैसेसुध्दा परत केले नाहीत. उत्तर प्रदेश येथील मुरादाबाद येथे हा गुन्हा सोनाक्षी सिन्हा विरोधात दाखल करण्यात आला आहे.

३० सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्ड्सचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सोनाक्षीला बोलावण्यासाठी टॅलेंट फुलऑन कंपनीचे संचालक अभिषेक सिन्हा आणि एक्सीड एंटरटेन्मेंटशी संपर्क साधण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी सोनाक्षीने तब्बल 28 लाख 17 हजार इतकी रक्कम घेतली व ज्या कंपनीमार्फत हा व्यवहार करण्यात आला त्यांनाही पाच लाख रुपये इतके कमिशन द्यावे लागले होते.

सोनाक्षी येणार म्हणून या इव्हेंटसाठी प्रचंड जाहिरात आणि होर्डिंग्सही लावण्यात आले. कार्यक्रमाला गर्दीही मोठ्या प्रमाणावर जमली. परंतु ऐनवेळेस ती न आल्याने जमलेल्या जमावाने खुप तोडफोड आणि गोंधळ घातला.

याप्रकरणी आता सोनाक्षी काय प्रतिक्रीया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Recommended

Loading...
Share