शाहरुख खान स्टारर 'झीरो'च्या सेटवर लागली आग; थोडक्यात बचावला किंग खान

By  
on  

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा आगामी आणि बहुचर्चित सिनेमा 'झीरो'च्या सेटवर आग लागली आणि या आगीच्या वेळी शाहरुख खान तिथे उपस्थित होता, परंतु त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटी येथे 'झीरो'चं शूटींग सुरु असताना ही घटना घडली. एका प्रोमोशनल व्हिडीओचं शूटींग किंग खान यावेळी करत होता. फिल्मसिटीतील रिलायन्स स्टुडिओनं 3 येथे शूटींग सुरु होतं.

'झीरो'च्या सेटवर आग लागल्याचे समजात संपूर्ण एकच गोंधळ उडाला, मग त्यानंतर सुरक्षारक्षकांनी तत्परतेने पुढाकार घेऊन शाहरुख भोवती एक सुरक्षाकवच तयार करत त्याला स्टुडिओबाहेर सुखरुप  काढलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान 5 बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आग आटोक्यात आणल्याचे समजते.

 

Recommended

Loading...
Share