विनता नंदा बलात्कार प्रकरणी संस्कारी बाबूजी आलोक नाथ यांना दिलासा

By  
on  

प्रसिध्द निर्माती विनता नंदा हिच्यावरील बलात्कार प्रकरणी बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी आलोक नाथ यांना दिलासा मिळाला आहे.  दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. विनता यांनी बलात्काराचा आरोप करत आलोक नाथ यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यामुळे आलोक नाथ यांना कधीही अटक होण्याची शक्यता होती. तसंच पोलिसही त्यांच्या घरी चौकशीसाठी गेले असता ते कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे कारण देण्यात येत असे.  या अटकेपासून बचाव करण्यासाठी आलोक नाथ यांनी दिंडोशी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

आलोक नाथ यांनी विनता यांचे बलात्काराचे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत, तसंच याप्रकरणी त्यांनी विनता विरोधात अब्रुनुकसानीचा दावासुध्दा दाखल केला आहे.

https://twitter.com/ANI/status/1081470364796866560

ओशिवरा पोलिसांनी आलोकनाथ यांच्याविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र अद्यापपर्यंत आलोकनाथ यांना अटक करण्यात आलेली नाही.विनताच्या आरोपानंतर संध्या मृदुल, हिमानी शिवपुरी ,रेणूका शहाणे  या बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आलोकनाथ यांच्याविरोधात आवाज उठवला होता.

 

काय होती विनता नंदाची फेसबुक पोस्ट 

विनताने लिहलं होतं, “आलोकनाथ यांची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड आहे. आमचा खुप मोठा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आहे. आम्ही जवळपासच राहत होतो. त्यावेळेस मी दूरदर्शनवरील नंबर वन शो ताराची निर्मिती व लेखनही करत होती. ते माझ्या शोमधील नायिकेमध्ये बरेच इंटरेस्टेड होते, पण ती त्यांना धुडकावून लावत होती. त्यावेळेस ते टीव्हीचे स्टार असल्याने नेहमीच उद्दामपणाने वागत.एकदा त्यांनी त्या नायिकेबरोबर एवढी असभ्य वर्तवणूक केली की तिने त्यांना सर्वांसमोर जोरदार कानाखाली लावून दिली.

विनता पुढे सांगते, पण मोठा अभिनेता असल्याने आलोकनाथ यांच्या बेताल वागण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जायचं. माझ्याबरोबरसुध्दा त्यांनी खुप असभ्य वर्तवणूक केली आहे. एकदा एका पार्टीत त्यांनी माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून माझ्यावर बलात्कार केला.

Recommended

Loading...
Share