By  
on  

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला ईडीची नोटीस; तस्करीचा आहे आरोप

परकीय चलन बेकायदेशीरपणे भारताबाहेर नेल्याप्रकरणी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

2011 साली दिल्ली विमानतळावर राहत फतेह अली खान यांची तपासणी करण्यात आली होती. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना या तपासणीत राहत फतेह अली यांच्याकडे १.२४ लाख अमेरिकी डॉलर सापडले होते. चौकशी दरम्यान इतकी रक्कम कुठून आली, याची माहिती खान देऊ शकले नाही. राहत फतेह अली खान यांनी परकीय चलनाची तस्करी केल्याचा संशय तेव्हापासूनच  आहे. त्यावेळी त्यांच्यासह त्यांच्या मॅनेजरचीसुध्दा ताब्यात घेऊन ईडीने चोकशी केली होती.

आता ईडीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास राहत फतेह अली खान यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तसंच त्यांच्यावर ३०० टक्के दंड आकारला जाऊ शकतो आणि दंड भरण्यास असमर्थ ठरले तर लूक आऊट नोटीस बजावली जाऊ शकते.

Recommended

PeepingMoon Exclusive