By  
on  

'सैराट' ची जादू आता छोट्या पडद्यावर, जाणून घ्या सविस्तर

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'ची जादू अजूनही ओसरलेली नाही. 'सैराट'ने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळा इतिहास घडवला शिवाय कमाईचे सुद्धा अनेक विक्रम मोडीत काढले. आर्ची आणि परश्याची जोडी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. एका रात्रीत स्टार होणं काय असतं, हे  या दोन कलाकारांनी चांगलंच अनुभवलं. तसेच सिनेमातली गाणीसुद्धा प्रचंड गाजली.

मराठी सिनेसृष्टीत यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाची भुरळ बॉलीवूड पासून ते अगदी दाक्षिणात्य सिनेमांना पडली. २०१८ साली करण जोहरने या सिनेमाची बॉलीवूडमध्ये 'धडक' हा हिंदी रिमेक बनवला. या सिनेमाला सुद्धा प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. तसेच 'मनसू मल्लिगेय' हा कन्नड सिनेमा सुद्धा 'सैराट' वर आधारित होता.

या 'सैराट'चं आकर्षण छोट्या पडद्याला सुद्धा झालं आहे. अशी माहिती मिळत आहे की 'सैराट' वर आधारित लवकरच एक हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'जात ना पूछो प्रेम की' असं या  हिंदी मालिकेचं नाव असणार आहे. या मालिकेत ही कथा उत्तर प्रदेशमध्ये घडणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून छोट्या पडद्यावर ही मालिका लोकप्रिय ठरणार का, याचं सर्वांना कुतूहल आहे.

पुढील महिन्यात म्हणजेच 18 जूनपासून 'जात ना पूछो प्रेम की' ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8 वा. प्रसारित होणार आहे.

https://twitter.com/AndTVOfficial/status/1126806292603871232

Recommended

PeepingMoon Exclusive