By  
on  

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' वादाच्या भोव-यात, बिग बींनासुध्दा मिळाली नोटीस

नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन ची प्रमुख भुमिका असलेला 'झुंड' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. 'झुंड' द्वारे नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. परंतु आता हा सिनेमा वादाच्या भोव-यात सापडला आहे. 

हैद्राबादमधील सिनेनिर्माते नंदी कुमार यांनी 'झुंड' च्या निर्मात्यांनी काॅपीराईटचा भंग केल्याची नोटीस पाठवली आहे. तसेच 'झुंड' सिनेमा ज्या विजय बरसे यांच्या जीवनावर आधारीत आहे त्यांना देखील नोटीस पाठवली आहे. नंदी कुमार यांनी 'झुंड' सिनेमाच्या निर्मात्यांनी फसवणुक केल्याचा आरोप करत सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. 

2017 साली कुमार यांनी स्लम साॅकर खेळाडु अखिलेश पाॅलच्या जीवनावर सिनेमा काढण्यासाठी हक्क विकत घेतले. परंतु नागराज मंजुळे 'झुंड' द्वारे अखिलेश पाॅल यांना प्रशिक्षण देणा-या विजय बारसे यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवत आहेत. 'झुंड'मध्ये अखिलेश पाॅलचा सुद्धा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे नंदी कुमार यांनी नागराज मंजुळे आणि सिनेमाशी संबंधित काही व्यक्तींवर काॅपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive