सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावूक झाली त्याची ही सहकलाकार, म्हटली “अजून खूप काही बाकी होतं..”
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काल सकाळी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारामध्ये त्याची सहकलाकार असलेली संजना सांघी त्याच्या निधनाने प्रचंड भावूक झाली आहे. तिला अश्रू अनावर झाले. नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओसोबत ती लिहीते की, “अजून खूप काही बाकी होतं सुशांत ? मी जवळपास 100 वेळा माझं वेब पेज रिफ्रेश करून पाहिलं की कदाचीत ही बातमी एक विनोद असेल. हे पचवायला मी सुसज्ज नाही. आणि मला वाटते मी हे कधीच पचवू शकत नाही. मी माझ्या भावना बोलण्यासाठी सज्ज नाही पण मी प्रयत्न करतेय. माझा पहिला सिनेमा आपण पाहणार होतो आणि तू मला सांगीतलं होतस की आपला सोबतचा हा तुझा सगळ्यात उत्कृष्ट सिनेमा असेल. आपल्या 16 तासांच्या शूटच्या मध्यात तू मला सांगीतलं होतस की ‘मॅनी’ बनून तुला आनंद झाला होता. शिवाय तू पटकन हे देखील बोलून गेला होतास त्याचा अर्थ मी समजू शकले नव्हते..”
य़ा आणि इतर बऱ्याच गोष्टी ती बोलून गेली. मुकेश छाबरा दिग्दर्शित आगामी सिनेमा ‘दिल बेचारा’ हा जॉन ग्रीन यांच्या द फॉल्ट इ अवर स्टार्स या पुस्तकावर आधारित आहे. जो याचवर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. जो आता ओटीटी डिझने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
शिवाय अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही सुशांतच्या जाण्यानं दु:ख व्यक्त केलं आहे. तिलाही सुशांच्या जाण्याने धक्का बसला आहे.
'सोनचिरीया' सिनेमात सुशांच्या सहकालाकाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमी पेडणेकरही त्याच्या जाण्याने धक्क्यात आहे. तिनेही सोशल मिडीयावर भावूक मेसेज लिहीला आहे.