By  
on  

हे फोटो पोस्ट करून अभिनेत्री क्रिती सनॉनची सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर भावनिक पोस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करून स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतची ही एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून जाणारी आहे. सुशांतच्या निधनाने बॉलिवुडसह त्याचे चाहतेही हळहळले. सुशांतसोबत ‘राबता’ या सिनेमात झळकलेली सहकलाकार क्रिती सनॉनने सोशल मिडीयावर एक भावूक पोस्ट केली आहे. दोघांची मैत्री फक्त या सिनेमापुरती नव्हती तर दोघं चांगले मित्र होते. याशिवाय दोघांच्या अफेअरच्या चर्चाही होत्या. दोघांनी काही जाहीरातींसाठीही एकत्र काम केलं होतं.

क्रितीने सुशांतसोबतच्या अंडर वॉटर सीनचा फोटो आणि आणखी काही त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट करत लिहीलं आहे की, “सुश.. मला माहिती होतं की तुझं हुशार डोकं हा तुझा बेस्ट फ्रेंड आहे शिवाय तुझा शत्रूही. पण या घटनेने मी तुटली आहे, की तुला मरणं हे जगण्यापेक्षा सोपं वाटलं. जर तुझ्या आसपास त्या क्षणी काही लोकं असली असती तर हे टळलं असतं कदाचित आणि जर तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना तू असं दूर केलं नसतस तर हे कदाचित घडलं नसतं. मी इच्छा व्यक्त करते की कदाचित मला ते जोडता आलं असते जे तुझ्या आतं तुटलेलं होतं. मी खूप खूप काही इच्छा व्यक्त करतेय. माझ्या ह्दयाचा एक भाग तुझ्यासोबत गेला आहे, आणि दुसऱ्या भागात तू सतत जिवंत राहशील. मी तुझ्या आनंदासाठी प्रार्थना करणं थांबवलं नाही आणि थांबवणार ही नाही..”
सुशांतच्या निधनाने क्रिती प्रचंड दु:खी झाली आहे. काल झालेल्या त्याच्या अंत्यसंस्कारालाही त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी ती हजर होती. 

Recommended

PeepingMoon Exclusive