By  
on  

या थ्रोबॅक व्हायरल व्हिडीओत दिसतोय सुशांत सिंह राजपूत, असा पाहिला होता त्याचा ‘एम एस धोनी’ सिनेमा 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. आणि आता आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत हा क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी साकारलेला ‘एम एस धोनी’ सिनेमा पाहत असल्याचं दिसतय. य़ा व्हिडीओत सुशांत पुस्तक वाचताना दिसतोय, सोबतच समोर असलेल्या टिव्हीवर तो त्याचा ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा पाहतोय. 
या व्हिडीओत धोनीच्या मैदानावरील क्रिकेट मॅचचा सीन आहे. तेवढ्यात कॅमेरा सुशांतकडे पॅन होतो जो हा सिनेमा पाहतोय, आणि तेवढ्यात सुशांत कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देत हळूच “धोनी धोनी” असं म्हणतो.
 

या सिनेमातील सुशांतने साकारलेल्या धोनीच्या भूमिकेसाठी त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होत. त्याने या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. आणि हुबेहुब धोनी सारखाच तो क्रिकेट खेळला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive