By  
on  

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' 24 जुलैला डिझ्नी प्लस हॉटस्टारवर होणार प्रदर्शित

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचे चाहत्यांना त्याच्या शेवटच्या सिनेमाची उत्सुकता आहे. 'दिल बेचारा' हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरलाय. त्याच्या चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होत आहे. कारण हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. शिवाय सिनेमाच्या मेकर्सनी या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 24 जुलै पासून डिझ्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा पाहता येणार आहे.

या सिनेमात सुशांतसोबत अभिनेत्री संजना सांघी झळकणार आहे.  

 सुशांत आणि संजनाची ही फिल्म 'दिल बेचारा' ही हॉलिवुडमधील प्रसिद्ध फिल्म आणि नोवल 'फॉल्ट इन अवर स्टार्स'चा हिंदी रिमेक आहे. कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबराने याचं दिग्दर्शन केलं आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive