२३ वर्षांपूर्वीच्या सोनू सूदचा हा फोटो एकदा पाहाच, शेअर केलाय थ्रोबॅक फोटो

By  
on  

स्थलांतरित मजूरांसाठी देवदूत बनून आलेल्या अभिनेता सोनू सूदचं आज सर्व स्तरातून कौतुक होत आहे.त्याच्या कार्याची माहिती तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही. सोनू आणि त्याची टीम लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पोहचवण्याची व्यवस्था अहोरात्र केली. तरीही आपल्या कामाची कोणतीही अवास्तव प्रसिद्धी तो करताना दिसत नाही. तो आपसूकच प्रसिध्दी झोतात आला. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये किंवा सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी तो आता नेहमीच हिहरिरीने सहभाग घेताना पाहायला मिळतो. 

. करिअरच्या सुरुवातीला तो कसा दिसत होता? हे आपल्या चाहत्यांना दाखवण्यासाठी त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. २३ वर्ष जुना हा फोटो पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

...and I dared to become an actor. #1997

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on

 

हा फोटो १९९७ सालचा आहे. “त्यावेळी मी अभिनेता होण्याची हिंमत केली होती” अशा आशयाची कॉमेंट त्याने या फोटोवर लिहिली आहे. २३ वर्ष जुना हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

Recommended

Loading...
Share