पाहा 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' चा ट्रेलर , उंच झेप घेण्याची महत्त्वकांक्षा बाळगतेय गुंजन

By  
on  

पिपींगमून डॉट कॉमने यापूर्वीच तुम्हाला हे सांगितलं होतं की जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला येतोय. तो आता नेटफ्लित्सव प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर भेटीला आला आहे. 

आर्मीच्या जगात मुलींना स्थान मिळवणं किती अशक्य आहे हे तुम्हा-आम्हा सर्वांनाच माहितीय. त्यातच एकतर तुम्ही स्वत:ला सिध्द करुन दाखवा किंवा मग घरी जाऊन स्वयंपाकघरात काम करा, अशी धारणा असते. 

गुंजन हार मानणा-यांमधली कधीच नव्हती,तिला तिचं स्वप्नं पूर्ण करायचं होतं. एअरफोर्सचा एक महत्त्वाचा भाग बनण्याचं स्वप्न ती उराशी बाळगून होती.

पाहा ट्रेलर 

 

भारताच्या लढाऊ विमानाची माजी फायटर पायलट गुंजन सक्सेनाची व्यक्तिरेखा जान्हवी सिनेमात साकारते आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने आणि झी स्टुडिओजने याची निर्मिती केली आहे.

Recommended

Loading...
Share