बापरे ! आशा भोसले यांना आलं चक्क 2 लाख रुपये विजेचं बिल

By  
on  

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील कलाकारांना विजेच्या बिलावरील मोठ्या आकड्यांनी मोठा धक्का दिला आहे. यात आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बाबतीतही असच झालं आहे. आशा भोसले यांना चक्क 2 लाख रुपये विजेच्या बिलाने धक्का बसला आहे. 

जून महिन्यात अव्वाच्या सव्वा बिल पाठवणाऱ्या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी महाडिस्कॉप वादात असताना आता आशा भोसले यांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय. आशा भोसले यांच्या लोणावळा येथील बंगल्यासाठी 2 लाखहून अधिक विजेंच बिल पाठवण्यात आलं आहे. 

मात्र महाडिस्कॉम यांचं म्हणणं आहे की मीटरच्या रीडिंगप्रमाणे बिल पाठवण्यात आलं आहे. शिवाय आशाताईंना याविषयी आधीच सुचित केल्याचं ते सांगतात. आशाताईंना जून महिन्यात  2,08,870 रुपयांचं विजेचं बिल आलय तर मे महिन्यात  8,855.44 रुपये आणि एप्रिलमध्ये 8,996.98 रुपये इतकं बिल होतं.

गायिका आशा भोसले यांनी याविषयी तक्रारही केली आहे. मात्र याआधी तापसी पन्नू, हुमा कुरेशी या कलाकारांनीही विजेचं बिल जास्त आल्याने तक्रार केली होती. 

Recommended

Loading...
Share