सलमान खानने या अंदाजात चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

By  
on  

देशभरात ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यातच अभिनेता सलमान खाननेही त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी सलमानने एक हटके फोटो शेयर केला आहे. सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट करून सलमानने ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

या पोस्टमध्ये त्याने "ईद मुबारक" असंं लिहीलय. मात्र त्याचा हा फोटो लक्षवेधी ठरतोय. काळ्या रंगाचा टीशर्ट आणि त्यावर तोंडाला गुंडाळलेला कपडा हा लुक पाहून  सलमानच्या 'टायगर जिंदा है', 'एक था टायगर' या सिनेमांची आठवण येते. सलमानच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Eid Mubarak!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

सध्याच्या कोरोनाग्रस्त स्थितीत मास्क लावण्याची गरज आहे. असाच काहीसा संदेश त्याने तोंडाभोवती कपडा गुंडाळून दिल्याचं पाहायला मिळतय.

लॉकडाउन सुरु झाल्यापासून सलमान त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये राहतोय. तिथूनच सलमान विविध गोष्टीही शुट करतोय. नुकताच त्याने त्याचा शेती करतानाचे व्हिडीओ आणि फोटोही सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. सलमान या लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला. आणि फार्म हाऊसवर सध्या तो काय काय करतोय या गोष्टीही पोस्ट करतो.

Recommended

Loading...
Share