By  
on  

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केली 'ही' विनंती

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला सध्या अनेक नागमोडी वळणं प्राप्त होत आहेत. आरोपींचा शोध घेण्याऐवजी किंवा आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं कारण शोधण्याऐवजी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून केलेल्या आत्महत्येला आता जळपास दीड महिन्याच्या वर काळ उलटून गेला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडीलांनी पटना येथे सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सुशांत आत्महत्येच्या तपासाने आता चांगलाच जोर धरलाय. रियाकडे सर्वजण आता संशयी नजरेने पाहतायत किंबहुना तिलाच सुशांतच्या आत्महत्येसाठी चाहते जबाबदार धरु लागले आहेत. 

या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेल्या रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी  शुक्रवारी रियाचा व्हिडीओ शेअर करत सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. या नाट्यमय वळणानंतर आता  सुशांतच्या बहिणीने सोशल मिडीयावर पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची  विनंती केली आहे.

 ‘मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि तुम्ही या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मी विनंती करते. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते’ असे म्हटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे.

 

सुशांतची बहिण या पोस्टमध्ये लिहते, "नमस्कार सर, माझ्या मनात कुठे तरी असे वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. ज्यावेळी माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याच्या कोणी गॉडफादर तिथे नव्हता आणि आताही नाही. या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे आणि या प्रकरणातील पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही, आम्ही न्यायाची अपेक्ष करतो आहे."

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive