By  
on  

‘सडक 2’ चं नवीन पोस्टर समोर, या दिवशी सिनेमा येणार भेटीला

आलिया भट्ट, संजय दत्त, पूजा भट्ट आणि आदित्य रॉय कपूर  स्टारर ‘सडक 2’ चं नवीन पोस्टर समोर आलं आहे. हा सिनेमा 28 ऑगस्टला डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने महेश भट 21 वर्षांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहेत. या पोस्टरमध्ये आलिया, संजय आणि आदित्य एकत्र चालत आहेत. आलियाच्या हातात बॅगपॅक आहे तर आदित्यच्या हातात गिटार आहे.

 

 

तर संजय मोकळ्या हातानी चालताना दिसत आहे. मागील पोस्टरमुळे वादाला तोंड फुटलं होतं. या विरोधात मुझफ्फरपुर मध्ये याचिकाही दाखल केली गेली होती. या पोस्टरवर कैलाश पर्वत असू नये असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. 29 जूनला डिस्ने हॉटस्टारच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आलियाने स्वत: या पोस्टरचं अनावरण केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive