By  
on  

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : चौकशीसाठी रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल, पैशाच्या अफरातफरीचा आहे आरोप

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात पोहोचली आहे. रियावर पैशांच्या अफरातफरीचा   आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आज तिची चौकशी होणार आहे. ‘सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये’, अशी विनंती रियानं केली होती. परंतु, ईडीने रियाची ही विनंती फेटाळली आहे.

त्यानंतर आज रिया चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली आहे.रियासोबत तिचा भाऊ शोवीक चक्रवर्तीसुध्दा ईडी कार्यालयात पोहचला आहे. 

 

रियाची आज चौकशी होणार आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे ईडीने रियाला चौकशीसाठी समन्स बजावले होते. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला यामुळे वेगळेच वळण  मिळाले आहे. आता चौकशी अंंती काय उलगडा होतो, याकडे सुशांतच्या चाहत्यांसह अवघ्या  देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive