By  
on  

दीपिका पदुकोण, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे स्टारर सिनेमाच्या शुटिंगला नोव्हेंबरमध्ये होणार सुरुवात

करोना व्हायरसच्या साथीमध्ये जणू जग थांबलं आहे. आता पाच महिन्यानंतर हळू हळू शुटिंगला सुरुवात होताना दिसत आहे. आता अनेक नवीन प्रोजेक्टसनाही सुरुवात होताना दिसत आहे. दीपिका पदुकोण, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडे स्टारर या सिनेमाच्या शुटिंगलाही सुरुवात होणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये हा सिनेमा फ्लोअरवर जाण्याची शक्यता आहे. 

 

शकुन बात्रा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाच्या शुटचं लोकेशन श्रीलंका असणार आहे. जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स सुरु झाल्यावर 50 लोकांची टीम घेऊन शकुन श्रीलंकेला जातील. श्रीलंकेने 1 ऑगस्टपासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट सर्विस सुरु केली आहे. त्यामुळे भारतही नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स सुरु होतील अशी आशा आहे. त्यामुळे हा सिनेमाही लवकरच फ्लोअरवर जाईल अशी आशा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive