By  
on  

अभिषेक बच्चन करोना निगेटिव्ह; हॉस्पिटलमधून मिळणार डिस्चार्ज

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याची करोना चाचणी अखेर  निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. अभिषेकने करोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्याला रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती त्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. 

संपूर्ण बच्चन परिवारावर करोनाचं सावट होतं. आधी ऐश्वर्या आणि आराध्या करोनामुक्त होऊन हॉस्पिटलमधून घरी आल्या. त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चनसु्ध्दा घरी आले. परंतु अभिषेक बच्चन मात्र रुग्णालयात करोनाशी झुंज देत होता. गेल्या २८ दिवसांपासून अभिषेक हॉस्पिटलमध्ये आहे. करोरनावर उपचार घेत असला तरीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून तो सतत चाहत्यांच्या संपर्कात होता आणि आपली हेल्थ अपडेट शेअर करायचा. 

 

अभिषेक म्हणतो,  एक वचन हे एक वचनच असतं.आज माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं मी करोनावर मात करेन. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांची केलेल्या काळजीसाठी मनापासून धन्यवाद. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मनापासून त्यांचे आभार, 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive