By  
on  

आत्महत्येच्या आधी पार्टी एन्जॉय करतानाचा दिशाचा व्हीडीओ आला समोर

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला दिशा सालियनच्या आत्महत्येशी जोडलं जात आहे. दोघांच्या आत्महत्येमध्ये विविधं गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. काही रिपोर्ट्सनुसार ज्या रात्री दिशाने आत्महत्या केली त्या रात्री बॉयफ्रेंड रोहन रायसोबत तिचं भांडण झालं होतं ज्यामुळे तिने आत्महत्या केली. दिशाचा परिवारही या गोष्टींमुळे चिंतेत आहे. आणि आता सोशल मिडीयावर दिशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ 8 जूनचा आहे ज्यादिवशी तिने 14 व्या मजल्यावरून उडी मारली होती. 

या व्हीडीओत दिशा तिच्या मित्रमैत्रीणींसोबत डान्स करताना दिसत आहे. शिवाय या व्हीडीओत ती आनंदी दिसत आहे. 
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दिशाची आई वसंती सालियन म्हणाल्या की “माझ्या मुलीविषयी सोशल मिडीया आणि मिडीयामध्ये खूप काही बोललं जात आहे. मात्र खरं हे आहे की या सगळ्या गोष्टी चुकीच्या आणि अफवा आहेत.”
 

Recommended

PeepingMoon Exclusive