By  
on  

'लाल सिंह चड्ढा' च्या शूटींगसाठी आमिर खान तुर्की येथे पोहचला, फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्यानंतर आता बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट परदेशात शूटींगसाठी गेला आहे. 'लाल सिंह चड्ढा'  या आमिर खानच्या आगामी सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. आता आमिरसुध्दा या सिनेमाच्या शूटींगसाठी तुर्कीत पोहचला आहे. सिनेमाचे उर्वरीत सीन्स येथे चित्रित होणार आहेत. अद्याप सिनेमाचं 40 टक्के शूटींग हे बाकी आहे. 

इंटरनॅशनल एअरपोर्टवरचा आमिर खानचा हा फोटो खुप व्हायरल होत आहे. यात आमिरने मास्क घालून योग्य ती सर्व खबरदारी घेत शूटींगचा श्रीगणेशा केला आहे. 

 

सूत्रांनुसार, प्रोजेक्ट अद्याप पूर्ण झालं नसल्याने मेकर्स हा सिनेमा ख्रिसमसला नाही तर पुढल्यावर्षी एप्रिलदरम्यान प्रदर्शित करण्याच्या विचारात आहेत. १७ मार्च रोजी अमृतसरमध्ये लाल सिंग चढ्ढाचं चौथं शेड्यूल पूर्ण केल्यानंतर आमिरने सिनेमाचे पुढील सर्व शेड्यूल लॉकडाऊनमुळे रद्द केले होते. आता शूटींग पूर्ण झाल्यानंतर सर्वांचंच लक्ष आमिरच्या या बहुप्रतिक्षीत सिनेमाच्या रिलीज डेटकडे लागेल. 

 

'लाल सिंह चढ्ढा' हा सुपरहिट हॉलिवूड  सिनेमा फॉरेस्ट गम्पचा ऑफीशियल रिमेक आहे. आपला मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने या सिनेमाची कथा लिहली आहे. तर '3 इडियट्स' (2009)  नंतर करिना आणि आमिर खान एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive