By  
on  

'Gunjan Saxena: The Kargil Girl' Review: कारगिल युद्धाच्या कथेत जान्हवी कपूरची उंच झेप, अशी साकारली फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना

सिनेमा – गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल
कलाकार – जान्हवी कपूर, पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, मानव विज, आयेशा रझा मिश्रा
दिग्दर्शक – शरन शर्मा
निर्माते – धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओ
ओटीटी – नेटफ्लिक्स
रेटिंग – 4 मून्स   

 
बॉलिवुडमध्ये आता कारगिल वॉर सिनेमे बनण बंद झालेलं नसलं तरी गुंजन सक्सेना हा सिनेमा त्या इतर हिस्टोरिक ड्राम सिनेमांसारखा नाही. फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेनाची ही कहाणी आहे. जी भारतीय वायूसेनेत (Indian Air Force) वैमानिक (Pilot) आहे. जिथे ती पुरुष प्रधान डिफेन्स फोर्सेसमध्ये स्विकारलं जाण्यासाठी संघर्ष करते आणि कारगिल युद्धात स्वत:ला सिद्ध करते.   शरन शर्मा दिग्दर्शित या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. शिवाय अभिनेता पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, मानव विज, आयेशा रजा मिश्रा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जान्हवी कपूरने गुंजनच्या भूमिकेत विश्वसनीय काम केलं आहे. ती नाजूक आहे, अपमान सहन करते. कठीण गोष्टींना सामोरं जाऊन ती भारीतय वायूसेने वैमानिक बनण्यासाठी ती विविध अडचणींना सामोरं जाते. जी एका रात्री वडिलांजवळ रडत माघारी येते. मात्र जेव्हा युद्धासाठी बोलावणी येते आणि जेव्हा ती चिता चॉपरमध्ये तिच्या गणवेशात येते तेव्हा तिच्या डोळ्यात वेगळीच चमक पाहायला मिळते. 

 

 

 

गुंजनला लहानपणापासूनच पायलट बनण्याचं स्वप्न असतं. एक लहान मुलगी जे एविएटर सनग्लासेस घालते आणि कागदी रॉकेटसोबत आणि खेळणीतल्या विमानांसोबत खेळत मोठी झालेली आहे ती मोठी होऊन बनते गुंजन जी साकारली आहे जान्हवी कपूरने. मात्र तिचा भाऊ जे इंडियन आर्मीमध्ये सैनीक आहे त्याला वाटतं की गुंजन एअर होस्टेस बनणं योग्य आहे. त्याला असही वाटतं की मुली पायलट बनू शकत नाही. मात्र पायलट बनण्याचं स्वप्न तिची आवड बनून जातं. ज्यात तिचे वडिल तिला सहाय्य करतात.

गुंजनला नकारांना देखील सामोरं जावं लागतं. मात्र तिचे वडिल तिला पुन्हा तयार करतात आणि ट्रेनही करतात. हा सिनेमा आव्हानं आणि संघर्षांनी भरलेला आहे. ज्या गोष्टी गुंजन सक्सेनाने तिच्या खऱ्या आयुष्यात झेलल्या होत्या. गुंजनला त्या ठिकाणी महिना प्रसाधनगृह देखील सापडत नाही. शिवाय तिचा गणवेश कुठे घालावा हे देखील तिला कळत नाही. मग अखेर या छळवणूकीला कंटाळून गुंजन तिचा उड्डाण प्रशिक्षकाकडून स्पष्टीकरणाची मागणी करते. मात्र तो तिला पंजाच्या शर्यतीचा टास्क देतो. “शत्रूला रक्त बघायचं असतं अश्रू नाही. राष्ट्राचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. तुला उडण्याची संधी देणं नाह.”  यावेळी अश्रू अनावर झालेल्या गुंजनला असं सांगण्यात येतं.


 
मात्र सगळ्या गोष्टी सोडू गुंजन पुन्हा घरी येते. मात्र भारत-पाकिस्तानच्या कारगिल युद्धामुळे गुंजनला परत बोलावलं जातं. बचाव मिशनसाठी गुंजनला चिताह हेलिकॉप्टरद्वारे शत्रूच्या क्षेत्रात पाठवलं जातं. गुंजन या मिशनमध्ये यशस्वी होते आणि काही अधिकाऱ्यांचे प्राणही वाचवते. गुंजन सक्सेना या सिनेमात फक्त एकच चूक पाहायला मिळते. 1 तास 52 मिनिटांच्या या सिनेमात थोडीच एक्शन पाहायला मिळते. मात्र खऱ्या आयुष्यात गुंजन सक्सेना कारगील वॉरच्या वेळी 24 वर्षांची होती आणि तिने 40 मिशन केले होते. 

जान्हवी कपूरने या सिनेमात भावनांना नियंत्रित करून तिच्या नाजूक खांद्यांवर पेललय. शिवाय या सिनेमाही चांगलाच प्रभावित करतो. हा जान्हवी कपूरचा दुसरा सिनेमा असून यातील तिचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे. या सिनेमात जान्हवीच्या वाट्याला नाच गाणी आली नसली तरी ती एका सैनीकाच्या रुपात आहे जी युद्धात यशस्वी कामगीरी करते.  फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेनाची कहाणी जरी दुर्लक्षित झाली असली तर हा सिनेमा तिची कहाणी योग्य पद्धतिने मांडतो. सिनेमातील इतर कलाकारांच्या वाट्याला कमी सीन आले असले तरी त्या चांगले झालेत.. अभिनेता पंकज त्रिपाठी य़ांनी वडिलांच्या भूमिकेत जबरदस्त काम केलय. त्यांची भूमिका मुलगी गुंजन सोबत उंच कड्सारखे उभे दाखवले आहेत. अभिनेता अंगद बेदी आणि आयेशा रझा मिश्रा यांचाही चांगलं काम पाहायला मिळतं. अरिजीत सिंह, सुखविंदर सिंह, रेखा भारद्वाज आणि अरमान मलीकची गाणी इतकी प्रेरणादायी वाटत नाही. मात्री आर डी यांचं कॅमेरावर्क जबरदस्त झालय. ते पाहताना गुंजनचं हेलिकॉप्टर नद्या खोऱ्यांपासून ते कारगिल व्हॅली पर्यंतच्या पर्वतरांगांचा प्रवास करतानाचा थरार पाहायला मिळतो. 
जर तुम्हाला गुंजन सक्सेनाच्या खऱ्या आयुष्याविषयीची माहिती सिनेमारुपात जाणून घ्यायची असेल, गुंजनचा कारगिल वॉर पर्यंतचा प्रवास कसा होता हे अनुभवायचं असेल तर हा सिनेमा नक्की पाहा. 
 
 

Recommended

PeepingMoon Exclusive