अक्षय कुमारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, बनला 2020 मधील सर्वात महागडा भारतीय अभिनेता

By  
on  

फोर्ब्ज मासिकाने 2020मध्ये सर्वात जास्त मानधन घेणा-या अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बॉलिवूडमधून अक्षय कुमारचं या यादीत आहे. फोर्ब्ज मासिकाच्या 2020 यादीत असलेल्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमार हा एकमेव भारतीय आहे.  
त्याने यावर्षी 362 कोटी कमवून या यादीत सहावं स्थान पटकावलं आहे. मागील वर्षी तो या यादीत चौथ्या स्थानी होता.

 

एंडोर्समेंटमुळे अक्षयच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. या यादीत डिवाईन जॉन्सन, रेयान रेनॉल्डस, मार्क वॉहलबर्ग, बेन एफ्लेक, विन डिझेल, अक्षयकुमार, लीन मॅन्युअल मिरांडा, विल स्मिथ, एडम सॅंडलिअर, जॅकी चेन यांचा समावेश आहे. अक्षय सध्या त्याच्या ‘द एंड’ या सिरीजचं काम करत आहे. याशिवाय तो सुर्यवंशी, लक्ष्मी बाँब, बेल बॉटम, बच्चन पांडे, पृथ्वीराज या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share