Video : अक्षय कुमारचा दिवाळी धमाका, 'लक्ष्मी बॉम्ब' या दिवशी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

 ओटीटी व्यासपीठावर अनेक सिनेमे लॉकडाऊन काळात आले आणि आता येत्या काळातही येणार आहेतच. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित  'लक्ष्मी बॉम्ब' हा सिनेमा ओटीटीवरच प्रदर्शित होणार याचं खात्रीलायक वृत्त पिपींगमून डॉटकॉमने  यापूर्वीच तुम्हाला दिलं होतं. 

येत्या ९ नोव्हेंबर रोजी 'लक्ष्मी बॉम्ब'  हा सिनेमा डिस्नी प्लस हॉस्टारवर प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर व राघव लॉरेन्स दिग्दर्शित या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्कंठा आहे. अक्षय कुमारने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सिनेमाची रिलीजल डेट उलगडली आहे. तो म्हणतो, यंदा दिवाळीत तुमच्या घरी लक्ष्मीसोबत एक बॉम्ब पण येणार आहे. 

 

 

 

 

करोना संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड कलाकार आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यात संकोच मानत नाहीत तर उलट ती सुवर्णसंधी मानतात. अनेक मोठमोठे सिनेमे हे ओटीटीवर प्रदर्शित झाले तर आणखी आगामी सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आता सध्या तरी ओटीटीला पर्याय उरला नाहीय. 
 

Recommended

Loading...
Share