By  
on  

छोट्या पडद्यावर ऐतिहासिक मालिकांचा सुरुय जोरदार ट्रेंड

महाराष्ट्रातील बहुतांश मध्यम वर्गाचा मालिका हा जीव की प्राण. अनेक प्राईम टाईमच्या मालिका त्यांच्या हटके विषयांमुळे लक्षवेधी ठरल्या आहेत. पण मागील काही दिवसात मालिकांचा ट्रेंड बदलताना दिसत आहे. एरवी सासू-सुनेच्या विषयांवर बेतलेल्या मालिकांनी आता कात टाकली आहे. आता ऐतिहासिक मालिकांचा ट्रेंड बदलताना दिसत आहे. पाहुयात कोण कोणत्या आहेत या मालिका: 

स्वराज्यरक्षक संभाजी: शिवपुत्र संभाजी महारांचा इतिहास सगळ्यांना माहिती असला तरी राजा म्हणून असलेली त्यांची कारकीर्द फारच थोड्या लोकांना माहिती आहे. नेमका हाच धागा पकडून ही मालिका रसिकांसमोर आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

स्वामिनी: इतिहासातील रमा-माधवच्या प्रेमकहाणीवर आधारलेली ही मालिका आहे. पण या प्रेमात खरा अडसर आहे तो गोपिका बाईंचा. पेशवेकालीन पार्श्वभूमीवर आधारलेली ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. 

सिंधू: एकोणिसाव्या शतकातील समाजजीवनाचा वेध घेणारी ही मालिका एका मुलीच्या भावविश्वावर आधारित आहे. ‘फक्त मराठी’वर ही मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे. 

स्वराज्यजननी जिजामाता: जिजाऊंच्या तेजस्वी प्रवासाचा अनुभव रसिकांना या मालिकेतून घेता येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने जिजाऊंच्या जीवनाचा वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर येत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा: डॉ. बाबासाहेबांचा जीवन प्रवास आणि कार्य प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे. या मालिकेच्या माध्यमातून बाबासाहेबांचा संघर्ष आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया अनुभवता येणार आहे. 

सावित्रीजोती: राजमाता जिजाऊंनंतर आता सोनी मराठी पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जीवन गाथा पडद्यावर आणत आहे. स्त्री शिक्षणाच्या ध्येयाने झपाटलेल्या जोडप्याची कथा मालिकेच्या माध्यामातून रसिकांना पाहायला मिळणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive