By  
on  

'सिंहासन' ते 'धुरळा', एक नजर सिनेसृष्टीतल्या मराठी सिनेमांच्या राजकीय प्रवासावर

मराठी सिनेसृष्टीत लवकरच मल्टीस्टारर राजकीय पार्श्वभुमी असलेला 'धुरळा' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजकीय पार्श्वभुमी असलेले सिनेमे मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन नाही. 'धुरळा' निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील राजकीय सिनेमांवर टाकलेला दृष्टीक्षेप, 

1) सिंहासन
1979 साली आलेला जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन' हा सिनेमा आजही मराठीतला राजकीय सिनेमांमधील मानदंड मानला जातो. राजकारणातील सत्तासंघर्ष, पत्रकारांची मुस्कटदाबी, कामगार संघर्ष आदी अनेक विषयांना या सिनेमाने प्रभावीपणे स्पर्श केला. अरुण सरनाईक, डाॅ. श्रीराम लागु, निळु फुले, सतीष दुभाषी, नाना पाटेकर, रिमा लागु आदी दिग्गज कलाकारांचा एकत्रित अभिनय हा रसिकांसाठी एक पर्वणी

2) सामना
1974 साली आलेल्या 'सामना' मध्ये राजकीय संघर्ष तसा नव्हता. परंतु गावातीमधील करारी राजकारणी हिंदुराव धोंडे पाटील याची जेव्हा एका बेवड्याशी गाठ पडुन त्यांच्यातील संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. डाॅ. श्रीराम लागु आणि निळु फुले यांच्या अभिनयाचा 'सामना' पाहाणं एक अविस्मरणीय अनुभव

3) वजीर
बुद्धीबळात वजीर हा नेहमी महत्वाचा. तसेच राजकारणातला वजीर म्हणजे नेमका कोण? याचं उत्तर 'वजीर' पाहुन प्रेक्षकांना मिळेल. विक्रम गोखले, आशुतोष गोवारीकर, अश्विनी भावे, अशोक सराफ या कलाकारांच्या यात प्रमुख भुमिका होत्या. 

4) सरकारनामा
श्राबणी देवधर यांचा 1998 साली आलेल्या राजकीय डावपेच, सत्तासंघर्षावर आधारीत 'सरकारनामा' हा सिनेमा सुद्धा उत्तम राजकीयपट म्हणुन ओळखला जातो. दिलीप प्रभावळकर, अजिंक्य देव, मिलिंद गुणाजी, आनंद अभ्यंकर आदी कलाकारांच्या अभिनयाने हा सिनेमा सजला होता. 

5) आजचा दिवस माझा
2006 साली आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'आजचा दिवस माझा' या राजकीय पार्श्वभुमी असलेल्या सिनेमाचं प्रेक्षक-समीक्षकांकडुन नावाजला गेला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या विश्वासराव मोहीते यांच्याकडुन नकळतपणे एका अंध गायकाचा अपमान होतो. त्यानंतर अस्वस्थ झालेले मुख्यमंत्री एका रात्रीत त्या गायकाला घर कसं देतात याची रंजक कहाणी म्हणजे हा सिनेमा. राजकारणी आणि प्रशासनातील उच्च अधिकारी यांच्यातील आंतरीक संघर्ष हा सिनेमाचा केंद्रबिंदु होता. सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भुमिका होत्या. 

6) झेंडा
नेते आणि कार्यकर्ते यांचा परस्पर संबंध. परंतु राजकारणाच्या चक्रात कार्यकर्ता कसा भरडलो जातो याचं समर्पक चित्रण अवधुत गुप्ते दिग्दर्शित 'झेंडा' मधुन करण्यात आले. राजेश शृंगारपुरे, पुष्कर श्रोत्री, सिद्धार्थ चांदेकर, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर आदी कलाकारांच्या 'झेंडा' मध्ये प्रमुख भुमिका होत्या. 

7) धुरळा
खुप दिवसांनी मराठीत 'धुरळा' निमित्ताने मल्टीस्टारर राजकीय सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ यांच्या प्रमुख भुमिका आहेत. हा सिनेमा 3 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive