व्हॅलेंटाईन डेटला जाताय, खास दिसायचंय? मग फॉलो करा या मराठी अभिनेत्रींचे लुक्स

By  
on  

सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईनचं गुलाबी वातावरण पसरलं आहे. हा व्हॅलेंटाईन वीक उत्साहात साजरा करण्यासाठी आणि यादगार करण्यासाठी तरुणाईची गडबड सुरु आहे. व्हॅलेंटाईन स्पेशल डेट किंवा पार्टी, गेट टुगेदर किंवा रोमॅण्टीक डिनर असा काही ना काही प्लॅन ठरतोच. मग मुलींना मात्र प्रश्न पडतो या दिवशी नेमकं काय घालायचं आणि आपल्या प्रिय व्यक्तीला कसं इम्प्रेस करायचं, त्याच्याकडून खास दाद कशी मिळवायची? पण तुम्ही आता टेन्शन घ्यायची अजिबातच गरज नाही, जरी व्हॅलेंटाईन डे आता एका दिवसावर येऊन ठेपला  असला तरीही.

 
मराठी अभिनेत्री या अभिनय असो किंवा स्टाईल,प्रत्येक बाबतीत आघाडीवर असतात. नेहमीच त्यांचे फॅशन स्टेटमेन्ट आपल्याला  भुरळ पाडतात. म्हणूनच यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला या मराठी अभिनेत्रींचे हे लुक्स फॉलो करा आणि स्पेशल दिसा. 

 

 

सई ताम्हणकर 

मराठीतील सर्वात आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चाहत्यांना  घायाळ करते. सईने पसंती दिलेल्या या वायब्रंट आणि कलरफुल फ्लेअर असलेले वनपीस व गाऊन्स तुम्हीसुध्दा ट्राय करु शकता. त्यावर कुठलीही ज्वेलरीशिवाय हा सिंपल मे डिंपल लुकमध्ये तुम्हीपण उठावदार दिसाल यात शंका नाही. 

 

 

 

अमृता खानविलकर 

 

मराठीसह बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाची छाप पाडणारी हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकरचे हे शॉर्ट , डार्क व फ्रेश कलरचे स्कीन फीट शॉर्ट ड्रेस तुमच्या व्ही डेसाठी उत्तम पर्याय ठरतील 

 

 

 

 

 

 

 

 

 प्रिया बापट

 

आपल्या हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी आणि फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रियासुध्दा नेहमीच फॅशनेबल राहण्याला पसंती देते. प्रियाच्या या विविध लुक्समध्ये मस्त वैविध्य पाहायला मिळतंय. यात जम्पसूट, ग्लिटरी हॉट पार्टी वेअर आणि ट्रेडीशन पण हटके ड्रेस असे पर्यायही तुमच्यासाठी बेस्ट आहेत. 

 

 

 

 

 

 

 

संस्कृती बालगुडे 

आपल्या स्टायलिश अंदाजातील विविध फोटोशूटमुळे बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमीच चर्चेत असते. तिच्या या हटके स्टाईल्स तुम्हाला नक्कीच आवडतील. ब्लॅक आणि रेड बॉडी फीट शॉर्ट ड्रेस, ब्लॅक ड्रेस, फुल स्कर्ट ड्रेस असे विविध पर्याय तुम्हालासुध्दा ट्राय करायला अजिबातच हरकत नाही. 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रार्थना बेहरे 

सहज सुंदर अभिनयाने रसिकांची लाडकी असणारी प्रार्थना बेहरेचे हे लाईट कलर शेड्समधील हे विविध लुक्स तुम्हाला पण खासच वाटतील. यात तिने परिधान केलेले एथनिक ड्रेस, डेनिम स्कर्ट टॉप, सिंपल सॅटीनचा शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट ड्रेस असे ऑप्शन्स तुमच्यासाठी छान आणि कम्फर्ट देणारे ठरतील. 

 

 

 

 

 

 

 

 

पूजा सावंत 

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनायची चुणूक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजाच्या फॅशनची नेहमीच चर्चा होताना पाहायला मिळते. विविध फॅशन शोज्मध्येही शो स्टॉपर होण्याचा मान तिला मिळतो. तुम्ही जर पूजासारख्याच उंच असाल तर तुम्हालाही तिने कॅरी केलेले हे ट्रेडीशन आणि वेस्टर्न आऊट्फिटचे लुक ट्राय करुन तुमचा स्पेशल डे यादगार करु शकता.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share