'रामायणा'तील 'मंथरा' ते मराठी सिनेसृष्टीची खाष्ट 'सासू', जाणून घ्या ललिता पवार यांच्याबद्दल

By  
on  

सध्या करोना विषाणूने जगभर थैमान घातलं आहे. देशातच नाही तर महाराष्ट्रातसुध्दा करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतेय. महाराष्ट्रातला लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला तर उद्या देशाला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत, तेव्हा ते आता काय घोषणा करतात याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे. 
दरम्यान, करोनासंदर्भात पूर्व खबरदारी म्हणून प्रत्येकाने घरीच थांबायचं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही आज बंद आहे. देशवासियांनी , घराबाकठीण काळात घरीच रहावं, घराबाहेर पडू नये म्हणून पुन्हा जुन्या दूरदर्शनवर गाजलेल्या मालिका पुन्हा प्रसारित करण्यात येत आहेत. त्यात रामायण मालिका अग्रस्थानी आहे. ९० च्या दशकात जे्व्हा ही मालिका प्रसारित व्हायची तेव्हा रस्ते अक्षरश: ओस पडायचे. तेच पुन्हा आत्ता हिंदी टीआरपीमध्ये बाजी मारुन रामायणने सिध्द करुन दाखवलं. 

‘रामायण’मध्ये मंथरा ही भूमिका साकारणा-या वृध्द अभिनेत्रीचा तुम्हाला खुप राग येत असेल. इतकंच काय कैकयीचं मत परिवर्तन करुन तिला रामाला वनवासात पाठवण्याचा सल्ला देणारी ही मंथरा नेहमीच टीकेची धनी झाली आहे. ही मंथरा म्हणजे मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार. 

हिंदी-मराठीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या ललिता पवार यांच्याबद्दल तुम्हाला ह्या गोष्टी नक्कीच जाणून घ्यायला हव्या. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली व त्यांचं अवघं जीवनच बदलून गेलं. 

ललिता पवार यांनी नायिका म्हणून मराठी सिनेसृष्टीत अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. १९४२ मध्ये आलेल्या ‘जंग-ए-आझादी’ या सिनेमाच्या सेटवर एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान, भगवान दादा यांना ललिता पवार यांच्या कानाखाली मारायची होती. भगवान दादा यांनी जोरात कानाखाली मारली ज्यामुळे त्या खालीच कोसळल्या. त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले. त्यानंतर त्यांच्या शरीराच्या डाव्या भागात लकवा गेला व चेहरा कायमस्वरुपी बिघडून गेला.

त्यानंतर ललिता पवार यांचं नायिका बनण्याचं स्वप्न भंगलं. पण त्यांनी हार मानली नाही. नव्या जोमाने त्या पुन्हा कामाला लागल्या व त्यांनी त्यांचं व्यंगच त्यांचा यूएसपी केला व त्या उत्कृष्ट खलनायिका म्हणून मराठी व हिंदी सिनेसृष्टीवर राज्य करु लागल्या. 

ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी ललिताबाईंना अनाडी चित्रपटातील डिसा या भूमिकेकरिता फिल्मफेअरचा साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला (१९६०). त्यांना १९६१ साली संगीत नाटक अकादेमी पुरस्कार व १९७७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला. गृहस्थी, सजनी, अनाडी, घर बसा के देखो या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले.

अमृत (१९४२), गोरा कुंभार, जय मल्हार (१९४७), रामशास्त्री (१९४४), अमर भूपाळी (१९५१), मानाचं पान (१९५०), चोरीचा मामला (१९७६) या मराठी सिनेमांतल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. तर ‘श्री ४२९’, ‘हम दोनों’, ‘आनंद’, ‘नसीब’, ‘दुसरी सीता’, ‘काली घटा’ या सिनेमातल्या ललिता पवार यांच्या भूमिका विशेष गाजल्या, 

ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६  रोजी नाशिकच्या सुखवस्तू घरात झाला. त्यांनी दिग्दर्शक गणपतराव पवार यांच्याशी लग्नगाठ बांधली पण हा विवाह फार काळ टिकू शकला नाही मग त्यांनी निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी दुसरं लग्न केलं. 

वार्धक्यात त्या एकट्याच होत्या स्मृतीभ्रंश, कर्करोग यांनी त्यांना घेरलं आणि १९९० साली ललिता पवार यांचं पुण्यात निधन झालं. 

 

Recommended

Loading...
Share