अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकचा हा स्टायलिश अंदाज एकदा पाहाच !

By  
on  

मराठीतील प्रसिध्द अभिनेता आणि आता एक दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओक याने सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. 'कच्चा लिंबू' , 'हिरकणी' यांसारख्या दर्जेदार सिनेमांचं दिग्दर्शन करणा-या प्रसादचा आगामी सिनेमा चंद्रमुखीच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होतेय. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून याच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा होत आहे. 

प्रसाद सोशल मिडी'यावर सतत सक्रीय असतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाच्या परिक्षकपदी विराजमान असलेल्या प्रसादचे या निमित्ताने अनेक स्टायलिश लुक्स चाहत्यांसमोर येतात. 

ब्ल्यू डेनिमची जीन्स आणि डेनिमचं जॅकेट अशा स्टायलिश आऊटफिटमध्ये प्रसाद खुपच रुबाबदार दिसतोय. 

 

चाहत्यांनी प्रसादच्या या स्टायलिश आणि एकदम कडक  लुकवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.  

Recommended

Loading...
Share