By  
on  

साडीत खुललं सई ताम्हणकरचं सौंदर्य, पाहा Photos

मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री आणि स्टाईल आयकॉन सई ताम्हणकर नेहमीच आपल्या विविध लुक्स आणि फोटोशूटमुळे चर्चेत असते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोची परिक्षक असलेली सई सध्या गणेसोत्सवानिमित्त खास फेस्टिव्ह लुकमध्ये पाहायला मिळतेय. 

सिंपल साडीतला हा डिंपल लुक सईवर खुप खुलून दिसतोय.

 

ब्लॅक आणि गोल्डन शेड असलेल्या ब्लाऊजवर  फिकट यलो रंगाची जबरदस्त मिक्समॅच  सिंपल साडी सईने नेसली. त्यावर साजेसे दागिने तिच्या सौंदर्याला चार चॉंद लावतायत. त्यामुळे सईचा हा फेस्टिव्ह लुक प्रचंड भारी दिसतोय. 

 

चाहत्यांनासुध्दा सईचा हा लुक भलताच आवडला असून त्यांनी या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. यापूर्वी गणेशोत्सवानिमित्त सईने नऊवारी साडी असा खास मराठमोळा साज केला होता.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मराठमोळी ! #saitamhankar

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

Recommended

PeepingMoon Exclusive