By  
on  

Movie Review: शाहरुख फॅन्सना नक्की भावणार 'झिरो'चा बऊआ सिंग

सिनेमा : झिरो

दिग्दर्शक : आनंद एल.राय

कलाकार : शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ 

रेटींग : 3 मून 

  बॉलिवुडचा बादशाह सुपरस्टार शाहरुख खानचे सिनेमे म्हणजे इमोशन, ड्रामा आणि प्रेमाचं एक एन्टरटेन्मेन्ट पॅकेज असतं. चाहते त्याच्या  सिनेमांची अगदी चातकासारखी वाट पाहतात. आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झिरो’ या सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी प्रदर्शित झाली तेव्हा बुटक्या रुपातला शाहरुख नेमकं काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. कतरिना कैफ, अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान यांच्या अभिनयाने हा सिनेमा सजला आहे.  

कथानक

मेरठमध्ये राहणारा बऊआ सिंग म्हणजेच (शाहरुख खान) जन्मजातच कमी उंचीचा असतो. पण याचं दु:ख करत बसणाऱ्यापैकी तो नाही. मित्रांसोबत धम्माल-मस्ती करत आयुष्य बेधूंद जगण्य़ा-या 4 फुटाच्या बअुला अभिनेत्री बबीता (कतरिना कैफ)सह लग्न करण्याचे वेध लागलेले असतात. कित्येक मुलींना नकार दिल्यानंतर बऊला एक मुलगी आवडते. ही मुलगी म्हणजे दिव्यांग पण अत्यंत हुशार संशोधक आफिया (अनुष्का शर्मा) होय. जेमतेम दहावीपर्यंतही न शिकलेल्या बऊआला आपला जीवनसाथी म्हणून निवडण्यात आफियाला काडीमात्र रस नसतो. पण फक्त सहानभुती न दाखवता आपली हुशारी आवडलेल्या बहुवावर आफिया भाळते. पण अचानक एकदा बअुआच्या आयुष्यात स्वप्नवत भासावे तशी अभिनेत्री बबीता येते तेव्हा काय नाट्यमय घडामोडी घडतात. पुढे कथा काय वळण घेते हे  सिनेमात पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.

 

दिग्दर्शन

झीरो सिनेमात वीएफएक्सचा उत्कृष्ट वापर करण्यात आला आहे. चित्रपटाचा पहिला भाग मनोरंजन करतो. पण मध्यंतरानंतर कथा अशी काही वळण घेते की, दिग्दर्शक आनंद एल राय यांना नेमके काय सांगायचेय, असा प्रश्न पडतो. चित्रपटाची कथा भरकटते आणि क्लायमॅक्स तर भ्रमनिरास करतो.  

अभिनय

कतरिना कमालीची ग्लॅमरस दिसते. पण अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर ती एकदम झीरो ठरलीय.शाहरुखने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतलीय, हे आवर्जून सांगावे लागले. अनुष्का आणि शाहरुख यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं म्हणजे एक पर्वणीच आहे. जब तक है जाननंतर या तिघांची ही केमिस्ट्री पुन्हा या सिनेमात पाहायला मिळाली.    

सिनेमा का पाहावा

तुम्ही जर शाहरुखचे जबरदस्त चाहते आहात तर हा सिनेमा तुम्ही अजिबात चुकवू नका. फक्त कथानकाचा विचार ेकलात तर हा सिनेमा तुम्हाला तसा पटणार नाही पण निव्वळ विकेंडला एक साधारण टाईमपास मनोरंजन करायचा विचार असेल तर हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive