'चला हवा येऊ द्या'च्या ह्या लकी सिंगला तुम्ही ओळखलंत का?

By  
on  

 ‘चला हवा येऊ  द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान  निर्माण केली आहे. आजवर अनेक एपिसोडमधून  गेली सहा वर्ष सातत्याने ते  प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन  करतायत. ‘चला हवा येऊ द्या’च्या प्रत्येच भागाची रसिकांना आतुरता असते.  सागर कारंडे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे हे विनोदवीर कोणत्या रुपात दिसणार याची कायमच उत्सुकचा असते. 

 

थुकरटवाडीच्या मंचावर नुकताच एक चला हवा येऊ द्या स्पेशल लकी सिंग अवतरला आणि प्रेक्षक म्हणून विराजमान झालेल्या सेलिब्रिटींमध्ये एकच हशा पिकला.ह्या लकी सिंगला तुम्ही ओळखलंत का....अहो हा लकी सिंग म्हणजे आपला विनोदवीर भारत गणेशपुरे. 

नेहमीच विदर्भीय भाषेत विनोदी पंच करणारा अभिनेता म्हणून ख्याती असलेल्या भारतला लकी सिंग बनलेला पाहून खुद्द कार्यक्रमाचा  लेखक-दिग्दर्शक निलेश साबळेलासुध्दा धन्य झाल्यासारखं  वाटतंय. 

 

 

 

लकी सिंग बनलेल्या भारत गणेशपुरेची ही धम्माल चला हवा येऊ द्याच्या आजच्या 29 सप्टेंबरच्या भागात अनुभवता येईल. या एपिसोडसाठी डान्सिंग क्वीन साईज लार्ज, फुल चार्जची संपूर्ण टीम थुकरटवाडीत उपस्थित आहे. 
 

सोनाली कुलकर्णी, अद्वैत दादरकर आणि आरजे मलिष्का यांच्यासह डान्सिंग क्वीनच्या संपूर्ण टीमने चला हवा येऊ द्याच्या मंचावर या भन्नाट विनोदांच्या पर्वणीचा मनोसोक्त आस्वाद घेतला. 

Recommended

Loading...
Share