अनिरुद्धसोबतच्या प्रकाराबद्दल अरुंधती विचारणार का संजनाला जाब ?

By  
on  

'आई कुठे काय करते' या मालिकेला आता वेगळं वळण मिळालं आहे. इतके दिवस घरात सुरु असलेला लग्नसोहळा आणि कार्यक्रम अचानक थांबलं. अनिरुद्ध आणि संजनाला एकत्र पाहुन अरुंधतीला धक्का बसला होता. मात्र आता अरुंधती त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. 

घडल्या प्रकाराबद्दल अनिरुद्धशी बोलल्यानंतर आता अरुंधती संजनाला जाब विचारण्यासाठी जाणार आहे. अरुंधती चक्क संजनाच्या घरी जाते आणि तिच्याशी घडलेल्या प्रकाराबद्दल बोलते. मात्र यावेळी अरुंधती संजनाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. तो प्रश्न नेमका कोणता हे या मालिकेच्या पुढील भागात समोर येईलच.

 

मात्र एकीकडे सगळ्यांना समजून घेणारी, सगळ्यांचा सांभाळ करणारी, अनिरुद्धसाठी वाटेल ते करणारी अरुंधती मात्र आता बदलली आहे. घडलेल्या प्रकाराची शिक्षा ती अनिरुद्ध आणि संजनाला देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सध्या या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. याशिवाय या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत.

Recommended

Loading...
Share