पाहा Video : या वाहिनीवर पाहायला मिळणार केदार शिंदे यांची नवी मालिका

By  
on  

सध्याच्या टेलिव्हिजन मालिकांच्या गर्दीत काहीतरी नवं आणि आपलं वाटावं असं घेऊन येण्याची प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची इच्छा होती. आणि म्हणूनच केदार शिंदे आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. काही दिवसांपासून केदार हे सोशल मिडीयावर विविध गोष्टी पोस्ट करून मालिकेविषयीची उत्सुकता वाढवताना दिसले. आणि नुकताच एक व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या व्हिडीओतही केदार शिंदे यांनी मालिकेविषयीची माहिती अजून सविस्तर पद्धतिने सांगीतलेली नाही. मात्र हा व्हिडीओही आता उत्सुकता वाढवताना दिसतोय. 

कलर्स मराठी वाहिनीवर केदार शिंदे यांची आगामी मालिका पाहायला मिळणार आहे. नुकताच तसा प्रोमोही समोर आला आहे. या प्रोमोमध्ये इतर मालिकेतील कलाकार काहीतरी शोधताना दिसत आहेत. मात्र त्यांना काही सापडत नाही. "माझी माणसं भेटीला घेऊन येत आहे" असं म्हणत केदार शिंदे यांनी या प्रोमोतून उत्सुकता वाढवली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नवी सुरूवात.... श्री स्वामी समर्थ.

A post shared by Kedaar Yeshodhara Shinde (@kedaarshinde) on

 

तेव्हा ही नवी मालिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share