'डॉक्टर डॉन' मालिकेच्या टीमचा कौतुकास्पद निर्णय, जाणून घ्या

By  
on  

डॉक्टर डॉन मालिकेतील देवा भाई आणि डॉली बाईंची लव्ह-हेट स्टोरी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. पण अशातच आता 'डॉक्टर डॉन’ मध्ये  रोमॅंटिक पर्वाला सुरुवात झाली आहे. नुकतंच देवा भाईने डॉलीबाईंसमोर त्याचं प्रेम व्यक्त केलं. डॉलीबाईंनीही या प्रेमाचा स्विकार करत देवासोबतचं नातं मान्य केलं.  देवाभाईने नुकताच डॉलीबाईंचा वाढदिवस  जंगी सेलिब्रेट केला. आता यासोबतच प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, डॉक्टर डॉन मालिकेच्या भागांची नुकतीच शतकपूर्ती झाली. 

'डॉक्टर डॉन’ मालिकेने 100 भागांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे हा आनंद टीमने उत्साहात साजरा करायलाच हवा. पण त्यांनी तसं न करता एक स्तुत्य निर्णय घेतलाय. करोना पार्श्वभूमी व इतर मालिकेच्या सेटवरील दु:खद घटनांमुळे हा आनंद साजरा न करण्याचं ठरवलं आहे. 

 

 

'डॉक्टर डॉन' मालिकेच्या संपूर्ण टीमचं यासाठी शुभेच्छांसह सर्वत्र  कौतुक होत आहे. 

Recommended

Loading...
Share