By  
on  

पाहा Video : पश्याने मनावर दगड ठेऊन केला तात्याचा त्याग

‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षवेधी आहे. यापैकीच या भावंडामधला पश्या म्हणजेच प्रशांतच्या नाना त-हा पाहायला सर्वांना खुप आवडतं. 

पश्याची एक खासियत म्हणजे, जिथे पश्या तिथे त्याचा तात्या. तात्या आणि पश्याची जोडी सर्वत्र एकत्रच फिरते. आता तुम्ही म्हणाल हा तात्या कोण बरं...अहो, हा तात्या म्हणजे पश्याचा छोटा टेम्पो. पण पश्याचा त्याच्यावर खुप जी आहे. घरातल्या सदस्यासारखाच तो त्याला जीवापाड जपतो. पश्या तात्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही. पण नुकतंच कुटुंबासाठी आणि दुकानासाठी मनावर दगड ठेऊन पश्याला एक कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. 

 

पश्याने तात्याला विकून टाकलं आहे आणि त्याबदल्यात त्याला 80 हजार रुपये मिळाले आहेत. पण पश्याने तात्याला विकण्याचा घेतलेला हा कठोर निर्णय जेव्हा संपूर्ण कुटुंबाला कळणार तेव्हा काय होणार, पश्या तात्याशिवाय राहू शकणार का या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा  'सहकुटुंब सहपरिवार' मालिका सोम. ते शनि. 7.00 वाजता स्टार प्रवाहवर.

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive